Saturday, October 28, 2006

asach kahitari

नशीबवान तर सगळेच असतात
नशीबाला बदलणारा एखादाच असतो
हसतमुख तर सगळेच असतात
दुसर्याला हसवणारा एखादाच असतो
मर्त्य तर सगळेच असतात
कर्तुत्ववान अमर एखादाच असतो
चमकणारे कजवे बरेच असतात
प्रखरतेने उजळणारा एखादाच असतो
सुखचे सोबती सर्वच असतात
दुःखचा साथीदार एखादाच असतो
अनुभवाने शहाणे बरेच असतात
अनुभवालाही शाहाणा करणारा एखादाच असतो
जाळणारे बरेच असतात
मेणबत्तीप्रमाणे जळणारा एखादाच असतो

झेपेल तेव्ह्ढच दुख: तो आपल्याला देतो,
दिलेलं दुख: संपलं, की आपल्यालाच नेतो!!!

दिवस असे की कोणी माझा नाही,
अन मी कोणाचा नाही.

Sunday, October 08, 2006

भोगले जे.....Suresh Bhatt

भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले

ठेविले आजन्म डोळे, आपुले मी कोरडे
पण दुजांच्या आसवांनी, मज भिजावे लागले

लोक भेटायास आले, काढत्या पायासवे
अन अखेरी कुशल माझे, मज पुसावे लागले

गवसला नाहीच मजला, चेहरा माझा कधी
मी कशी होते मलाही आठवावे लागले

एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले
Suresh Bhatt